Saturday, 11 November 2017

मराठी आमचा अभिमान मराठी आमचा श्वास...

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...


इथं प्रत्येकाचा मराठी बाबत अट्टाहास आहे,
पण सोशल मीडिया वरची लिखाणाची भाषा मात्र (Khaas) आहे.

आई आता Mom झाली
बाबा आता Dad झाले
शब्दामधील भावना आता आपोआपच Dead झाल्या...

कट्टयावरच बोलण आता हिंदी मध्ये घडतय,
उच्चशिक्षण दाखवण्यासाठी प्रत्येकजण आता इंग्रजीच झाडतोय,
मायबोलीचा माझ्या या का विसर पडतोय ??

हिंदी झाली बोली भाषा,
तर, इंग्रजीला व्यवहारीचा दर्जा,
आपली मराठी भाषा सुद्धा "संस्कारी" आहे रे सर्जा...

मायबोलीत आहे माझ्या मऊ मधाळ गोडवा, 
कुणी वाकड्यात गेले तर त्याला तसेच राकटपणे तुडवा,
आहे तिच्यात ओवी, तर आहे शिवी सुद्धा,
तिच्या प्रत्येक शब्दांत आहे कणखर मराठी बाणा,
आहे तिच्यातच आपल्या मराठमोळे पणाचा कणा...

कळत नाही मराठी माणूस आज असा का वागतोय ??
ज्या मराठी ने शिकवल तिलाच जपाव लागतय,
इतर भाषिकांसोबत त्यांच्याच भाषेत बोलतोय,
मायबोली मराठीला आपल्याच राज्यात गहाण टाकतोय...

मराठीचा मुद्दा आता राजकारणापुरती उरलाय,
मराठयानी स्वाभिमान केव्हाच अहो पुरलाय,
भल्या बुऱ्या मुंबईत आता इतर भाषिकच दिसतो,
मराठी भाषिक व्यक्ती सुद्धा आता इतर भाषिकच भासतो...

तरी सुद्धा नावापुरते,,,,,,
मराठी आमचा अभिमान मराठी आमचा श्वास आहे,
पण सोशल मीडिया वरची लिखाणाची भाषा मात्र (Khaas) आहे.

लिखाण: ©भावेश कदम / मुंबई
दु.ध्वनी: ९७७३६२९९८३

Thursday, 12 October 2017

मी समुद्र बोलतोय....

मी समुद्र बोलतोय......
     बाळांनो, कसे आहात सुखी आहात ना ? तुमच्याकडे थोडा वेळ आहे का या अभाग्याकडे पहायला ? मी समुद्र तुम्हाला भरभरुन देणारा तुमच्यावर पित्या प्रमाणे प्रेम करणारा, आजवर मी माझ्या गर्भातुन तुम्हाला खनिज तेल, वाळु, मीठ, मासे, मौल्यवान मोती देत आलो. पण तुम्ही मला काय दिले ??
       नाही ना आठवत... मी सांगतो तुम्ही मला आजवर दिलात ते फक्त प्लास्टिक कचरा, केमिकलचे सांड पाणी, मलमूत्र, प्लास्टर ऑफ पेरिसची हानिकारक माती, मोठाल्या बोटीं मधुन निघणारे हानिकारक तेल... अजुन बरेच काही... तरीही मी गप्प राहिलो फक्त तुमच्यासाठी, पण आता नाही रहावल म्हणून तुम्हाला विनवणी करतोय ऐकाल ना माझं...??
         पुर्वार्धापासुन मी मानवाला पहात आलोय अगदी त्याच्या अंगावर कपडे नसल्या पासून ते आत्ता त्याच्या अंगावर कोट येई पर्यन्त... मी खुश आहे मानवाने प्रगती केली मानव सुधारला, पण खरच मानव सुधारला की फक्त दिसण्यापुरते सुधारला ? पहिल्यापेक्षा मानव आता अधिक घाण करु लागलाय. हे पर्यावरण हा निसर्ग मानवाने टिकवला तरच तो ही टिकू शकेल याचा जणू त्याला विसरच पडलाय. माणूस आता स्वार्थी झालाय.
         ही पहा (फोटो) माझी पिल्ले कशी निपचित पडलेली आहेत. यांच्या मृत्युचे कारण तुम्ही आहात. तुम्ही केलेल्या प्रदूषणामुळे यांना आपला जिव गमवावा लागलाय. याच प्रायश्चित्त करण्या ऐवजी तुम्ही यावर दुर्लक्ष करताय असे कसे काय तुम्ही करु शकता ?
         हे प्रेमी युगुलानों माझ्या किनार्यावर येता ना वेळ घालवायला पण कधीतरी माझ्यावर ही प्रेम करा ना...
         हे मित्र-मैत्रिणींच्या टोळक्यानो एकत्र येताना किनारी मजा मस्ती करायला पण माझ्या सोबत पण कधी मैत्री करा ना...
         अरे, तुम्ही देवाला पुजता ना त्याच देवाने ही सृष्टि बनवली आहे मग तुम्ही या निसर्गाला का नाही जपत ??
         मी पण ना कुठे तुम्हाला सांगत बसलोय, ज्या देवाला तुम्ही पुजता त्याच देवाला तुम्ही पायदळी तुडवता हे विसरलोच होतो.
         पण, मानवा एक लक्षात ठेव जर आत्ताच तू लक्ष नाही दिलेस तर याचे नक्कीच तुला गंभीर परिणाम भोगावे भोगावे लागतील आणि याचा सर्वस्वी जवाबदार तूच असशील....

तुमचाच समुद्र....

©लेखन: भावेश कदम.
(विचारांच्या दुनियेतून)
       

Tuesday, 3 October 2017

शिवजयंती उत्सव २०१७

जिजाऊंनी स्वप्न पाहिले
हिंदवी स्वराज्याचे...
मातेच्या त्या उदरी जन्मले,
भविष्य महाराष्ट्राचे..!!
भविष्य भारतभूचे..!!!

                 धन्य ती आई रोखु पाही,
                 अत्याचार यवनांचे ।।
                 मागते एकच रत्न चण्डिके,
                 पहा तू अश्रु नयनांचे ।।

भवानी आई जाग आता तु,
पेटविते तुझपुढे दिवा..!!
पेटविते तुझपुढे दिवा...!!!

                 आई भवानी प्रसन्न झाली,
                 पुत्ररत्न जाहला,
                 आला आला पुत्र जिजाऊचा,
                 ठेचण्या त्या विंचवा ।।

रण हे सोडुन पळु लागले,
सारे यवन हे ओरडू लागले,
"वाचवा-वाचवा"....
नाव तयाचे "सिवा"...!!!
नाव तयाचे "सिवा"...!!!

लेखन:
©भावेश महेंद्र कदम (मुंबई)
भ्रमणध्वनी: ९७७३६२९९८३

।। श्रीमंत बाजीराव पेशवा यांना मानाचा मुजरा ।।

मराठा सरदार,
उचलुनी तलवार,
रोखे वार, शत्रुंचे...

                 रणमर्द असा हा छावा,
                 दौडला पहा,
                 रक्षाया स्वराज्य शिवप्रभुंचे...

चाणाक्ष असे विचार त्याचे,
रणमैदानी चाल चाले कसे,
विचारांना पण होती त्याच्या धार,
त्यापुढे औरंग्या ही होता गपगार...

                 एकही लढा असा न जाहला,
                 मराठ्यांचा पराभव झाला,
                 संपूर्ण भारता पराक्रम केला,
                 असा एकची होऊन गेला,

युद्ध केले युद्ध जिंकले,
प्रेमातही तो हरला नाही,
किती महती त्याची गाऊ,
एकच होता आमचा "राऊ"...

।। श्रीमंत बाजीराव पेशवा यांना मानाचा मुजरा ।।

।। जय जिजाऊ ।। जय शिवराय ।। जय शंभु राजे ।।

लेखन:
©भावेश महेंद्र कदम (मुंबई)
भ्रमणध्वनी: ९७७३६२९९८३