Saturday, 11 November 2017

मराठी आमचा अभिमान मराठी आमचा श्वास...

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...


इथं प्रत्येकाचा मराठी बाबत अट्टाहास आहे,
पण सोशल मीडिया वरची लिखाणाची भाषा मात्र (Khaas) आहे.

आई आता Mom झाली
बाबा आता Dad झाले
शब्दामधील भावना आता आपोआपच Dead झाल्या...

कट्टयावरच बोलण आता हिंदी मध्ये घडतय,
उच्चशिक्षण दाखवण्यासाठी प्रत्येकजण आता इंग्रजीच झाडतोय,
मायबोलीचा माझ्या या का विसर पडतोय ??

हिंदी झाली बोली भाषा,
तर, इंग्रजीला व्यवहारीचा दर्जा,
आपली मराठी भाषा सुद्धा "संस्कारी" आहे रे सर्जा...

मायबोलीत आहे माझ्या मऊ मधाळ गोडवा, 
कुणी वाकड्यात गेले तर त्याला तसेच राकटपणे तुडवा,
आहे तिच्यात ओवी, तर आहे शिवी सुद्धा,
तिच्या प्रत्येक शब्दांत आहे कणखर मराठी बाणा,
आहे तिच्यातच आपल्या मराठमोळे पणाचा कणा...

कळत नाही मराठी माणूस आज असा का वागतोय ??
ज्या मराठी ने शिकवल तिलाच जपाव लागतय,
इतर भाषिकांसोबत त्यांच्याच भाषेत बोलतोय,
मायबोली मराठीला आपल्याच राज्यात गहाण टाकतोय...

मराठीचा मुद्दा आता राजकारणापुरती उरलाय,
मराठयानी स्वाभिमान केव्हाच अहो पुरलाय,
भल्या बुऱ्या मुंबईत आता इतर भाषिकच दिसतो,
मराठी भाषिक व्यक्ती सुद्धा आता इतर भाषिकच भासतो...

तरी सुद्धा नावापुरते,,,,,,
मराठी आमचा अभिमान मराठी आमचा श्वास आहे,
पण सोशल मीडिया वरची लिखाणाची भाषा मात्र (Khaas) आहे.

लिखाण: ©भावेश कदम / मुंबई
दु.ध्वनी: ९७७३६२९९८३