Sunday, 3 June 2018

पहिला पाऊस

तो आला...
तो आला आसुसलेल्या धरणी मातेला शांत करायला.

तो आला...
तो आला आशेने आभाळाकडे एकटक वाट पहात रहाणाऱ्या शेतकर्याचे अश्रु पुसायला.

तो आला...
तो आला त्या प्रत्येक किलबिल पाखरांच्या "येरे येरे पावसा" च्या हाकेला ओsss दयायला.

तो आला...
तो आला त्या प्रत्येक प्रेमात पडलेल्या प्रियकर/प्रेयसी च्या प्रेमाला गुलाबी ओलावा दयायला.

तो आला...
तो आला त्या प्रत्येक प्रेमभंग झालेल्या व्यक्तिच्या आयुष्यात एक सुंदर आठवणीचा ओलावा घेऊन त्याच्या चेहर्यावर एक स्मीत हास्य फुलवायला.

अखेर तो आलाच...
तो आलाच सुर्यदेवाचा प्रकोप शांत करुन जन माणसाला सुखी करायला.

पहिल्या पावसाच्या चिंब चिंब शुभेच्छा.

©भावेश कदम.
दि: ३ जुन २०१८