Tuesday, 27 October 2020

ती....

ती 

ती म्हणजे प्रेमाचा झरा,
ती म्हणजे रागाचा पारा...

ती म्हणजे हळुवार झुळूक,
ती म्हणजे अवखळ असा वारा...

ती म्हणजे आवडती वाट,
ती म्हणजे सोनेरी पहाट...

ती म्हणजे रानातली हिरवळ,
ती म्हणजे ओल्या मातीतली दरवळ...

लेखन: भावेश कदम©