ठाऊक आहे मला एके दिवशी तुझ्या हृदयाचे ठोके माझ्यासाठी धडकणे बंद होतील,
बंद व्हायच्या आधी, एक ठोका माझ्या नावचा चुकवशील ना ?
ठाऊक आहे मला एके दिवशी सोडशील माझा हात,
सोडायच्या आधी, एकदा घट्ट धरशील ना ?
ठाऊक आहे मला पुन्हा नाही येणार तू मला भेटायला त्या बागेत,
पण कधीतरी तिथे जाऊन एकदा तरी त्या बाकावर बसशील ना ?
ठाऊक आहे मला नाही येणार आवाज तुझा पुन्हा माझ्या कानी,
पण एकांतात, स्वत:हा च्या मनामध्ये कधीतरी Jerry म्हणून हाक मारशील ना ?
ठाऊक आहे मला तुझ्या आयुष्यात यशाची उत्तुंग शिखरे सर करशील, खुप काही कमवशील,
खुप काही कमवताना, या गमवलेल्याचा विचार करशील ना ?
ठाऊक आहे मला तू एके दिवस सोडून जाणार,
गेलीस तर, फक्त एकदा मागे वळुन पहाशील ना ?
ठाऊक आहे मला तू माझी नाही रहाणार,
पण एकदा माझी होऊन जाशील ना ?
ठाऊक आहे मला एक दिवस खुप दुर निघून जाशील,
पण जाण्याआधी, मला एकदा जवळ घेशील ना ?
करशील ना...........?