बेधुंद तू बेधुंद मी...
एकमेकांच्या साथी साठी तळमळावं
पण, सोबत असल्यावर थोडसं भांडाव...
मी दिवसभर रुसावं अन अबोला धरावा
आणि ऐन संध्याकाळी तू जवळ बसून हात हातात घ्यावा...
हातात हात घालून गप्पांची मैफल व्हावी
गप्पांच्या ओघात एखादी घट्ट मिठी सुद्धा दयावी...
मीठी मध्ये लाट प्रेमाची उठावी,
आणि अखेर ती ओठांच्या किनाऱ्यावर येऊन शांत व्हावी...
प्रेमाच्या या वादळामध्ये बेधुंद मी असाव बेधुंद तू असावी,
आणि या दुनियेची दोघांनाही तमा नसावी...
बेधुंद या प्रेमात एकमेकांवर प्रेम उतू जावं,
आणि उतू गेलेल्या प्रेमात दोघांनीही न्हाहुन जावं,
न्हाहुन जाता जाता वाहून जावं,
बेधुंद तू व्हावं, बेधुंद मी व्हावं....
भावेश कदम©
दि: २४ डिसेंबर २०१८
No comments:
Post a Comment