Friday, 31 January 2020

प्रेमांकुर...

प्रेमांकुर...

समुद्राच्या आवाजा प्रमाणे तू फक्त गर्जत राहाव आणि त्या शांत किनाऱ्या सारख मी तुला ऐकत रहावं...

त्याच्या खळाळणाऱ्या लाटांप्रमाणे तुझ्या मनातली वादळ जोरदार येऊन धडकावी आणि त्या स्तब्ध किनाऱ्या सारख तुझ्या प्रत्येक वादळाला अखेर मी शांत करावं...

वसंत ऋतुतल्या एखाद्या सरी प्रमाणे तुझ्या भावनेची सर बरसावी आणि ओसाडलेल्या जमिनी सारख मी त्यात न्हाऊन जावं...

बरसता बरसता तू ही शांत व्हाव आणि तुझ्या भेटीने मी ही भिजुन जावं, आपल्या दोघांच्या मिठीत एखादं प्रेमांकुर रुजावं...

ओल्या मातीचा गंध जसा पसरावा तसा तुझ्या माझ्या नात्याचा सुगंध चोहीकडे दरवळावा, काही काळासाठी का असेना प्रेमाचा ओलावा जरुर असावा...

भावेश कदम©
दि: १२ डिसेंबर २०१८

No comments:

Post a Comment