तू...
जेवणाच्या प्रत्येक घासामध्ये तू आहेस,
माझ्या घेतलेल्या प्रत्येक श्वासामध्ये तू आहेस...
हृदयाच्या प्रत्येक स्पंदनामध्ये तू आहेस,
देवाजवळ हात जोडून केलेल्या प्रत्येक वंदनामध्ये तू आहेस...
पावसाच्या प्रत्येक थेंबात तू आहेस,
साचलेल्या पाण्यात पाहिलेल्या प्रतिबिंबात तू आहेस...
सकाळच्या सुर्यप्रकाशात तू आहेस,
रात्रीच्या शीतल चाँदण्यात तू आहेस...
थंडीत गोठलेल्या पाऱ्यात तू आहेस,
रात्रीच्या गार वाऱ्यात तू आहेस...
इथल्या प्रत्येक वाटांमध्ये तू आहेस,
घड्याळाच्या धावत्या काटयांमध्ये तू आहेस...
झाडाला लागलेल्या प्रत्येक फुलांमध्ये तू आहेस,
हसत-खेळत बागडणार्या प्रत्येक निरागस लहान मुलांमध्ये तू आहेस...
लिखाण: भावेश कदम©
दिनांक: ०६ जुलै २०१९